जीवन सुन्दर आहे
तू असाच हसत रहा ।
प्रत्येक जण उदास चेहर् याने,
रोज फिरू लागला,
तर विश्व सारं उल्ट सुल्ट भासु लागेल।
आप ण सारे हरवलेले बनू,
म्हणून हसत रहा
हास्यानं हास्य वाढतं,पसरतं
म्हणून हसत रहा
कोणीतरी अभागी आनंदेल
सुखावशील तूही त्याने
आयुष्य म्हणजे निराशा जन्मभर
पण नकोच ही कुरकुर
हास्य म्हणजे इंद्रधनुष्य
अश्रुंच्या पावसातुन डोकावणारं
अरे,ते पहा तेथे सुख दडलय
म्हणून म्हणतो धीर धर
असाच हसत रहा
असाच दुखाच्या छातीवर बसून
पट्रीशिया मॉरीस
अनुवाद ....स्नेहप्रभा प्रधान